1. {#1परमेश्वराचा सेवक } [PS]पाहा, माझा सेवक, ज्याला मी उचलून धरतो; माझा निवडलेला, याच्या विषयी माझा जीव आनंदीत आहेः [PE][QS]मी आपला आत्मा त्याच्याठायी ठेवीन; तो राष्ट्रावर न्याय आणील. [QE]
2. [QS]तो मोठ्याने ओरडणार नाही किंवा आरोळी ठोकणार नाही किंवा त्याचा आवाज रस्त्यावर ऐकू येऊ देणार नाही. [QE]
3. [QS]तो चेपलेला बोरू मोडणार नाही आणि मिणमिणती वातसुध्दा तो विझवणार नाही. तो प्रामाणिकपणे न्याय देईल. [QE]
4. [QS]पृथ्वीवर न्याय प्रस्थापित करीपर्यंत तो मंदावणार नाही किंवा धैर्यहीन होणार नाही; [QE][QS]आणि किनारपट्टीवरील देश त्याच्या नियमशास्त्राची वाट पाहतील. [QE]
5. [QS]परमेश्वर देव हे म्हणत आहे, ज्याने आकाश निर्माण केले आणि त्यास विस्तारीले; ज्याने पृथ्वी पसरली आणि ज्यामध्ये जीवन दिले आहे; [QE][QS]तो त्यावरील लोकांस श्वास देतो आणि त्यावर राहणाऱ्यांना जिवन देतो; [QE]
6. [QS]मी, परमेश्वराने, तुला न्यायानुसार बोलाविले आहे आणि तुझा हात धरीन. [QE][QS]मी तुझे रक्षण करीन आणि तुला लोकांसाठी करार व परराष्ट्रीयांसाठी प्रकाश देणारा असे करीन. [QE]
7. [QS]आंधळ्यांचे डोळे उघडावे, बंदिवानांना अंधारकोठडीतून [QE][QS]आणि अंधारात बसलेल्यांना बंदीगृहातून सोडवावे. [QE]
8. [QS]“मी परमेश्वर आहे, हे माझे नाव आहे; [QE][QS]आणि मी आपले गौरव दुसऱ्यांबरोबर किंवा कोरीव मूर्तीबरोबर आपली स्तुती वाटून घेणार नाही. [QE]
9. [QS]पाहा, पूर्वीच्या गोष्टी घडून चुकल्या आहेत, [QE][QS]आता मी नवीन घटनेबद्दल जाहीर करतो. [QE][QS]त्या होण्यापूर्वी मी त्याबद्दल तुम्हास सांगत आहे.” [QE]
10. {#1परमेश्वराच्या महान मुक्तीबद्दल स्तवन } [QS]परमेश्वरास नवीन गाणे गा, आणि पृथ्वीच्या शेवटापासून, [QE][QS]जे तुम्ही खाली समुद्रात जाता आणि त्याच्यात जे आहे ते सर्व, किनाऱ्यावरील देश आणि तेथे राहणारे त्याची स्तुती करा. [QE]
11. [QS]वाळवंटांनो आणि नगरांनो आरोळी मारा, ज्या खेड्यात केदार राहतो, मोठ्याने आनंदाने ओरडा! [QE][QS]सेलात राहणाऱ्यांनो गायन करोत, डोंगरमाथ्यावरून आरोळी करोत. [QE]
12. [QS]त्यांना परमेश्वरास गौरव देऊ द्या आणि किनाऱ्यावरील देशात त्याची स्तुती जाहीर करोत. [QE]
13. [QS]परमेश्वर शूर योध्द्याप्रमाणे बाहेर जाईल; तो युद्धवीरासारखा पुढे जाईल. तो आपल्या आवेशाने उत्तेजित होईल. [QE][QS]तो ओरडेल, होय! तो आपल्या युद्धाची मोठ्याने ओरडून गर्जना करील; तो आपल्या शत्रूंना आपले सामर्थ्य दाखवील. [QE]
14. [QS]बराच वेळ मी काही बोललो नाही; मी स्तब्ध राहिलो आणि स्वतःवर संयम ठेवला; [QE][QS]आता मी प्रसूतिवेदना होणाऱ्या स्त्रीसारखा मोठ्याने ओरडेन, मी उसासे व धापा टाकीन. [QE]
15. [QS]मी टेकड्या आणि पर्वत उध्वस्त करीन आणि त्यांचे सर्व झाडेझुडपे मी सुकवून टाकीन; [QE][QS]आणि मी नद्यांची बेटे करीन आणि पाणथळ जमीन कोरडी करीन. [QE]
16. [QS]मी आंधळ्यांना माहीत नसलेल्या मार्गाने आणीन, त्यांना माहीत नसलेल्या वाटेने मी त्यांना नेईन, मी त्यांच्यापुढे अंधाराचा प्रकाश करीन, वाकडी ठिकाणे सरळ करीन. [QE][QS]या गोष्टी मी करीन आणि मी त्यांना सोडणार नाही. [QE]
17. [QS]जे कोणी कोरीव मूर्तीवर भरवसा ठेवतात, ओतीव मूर्तींना म्हणतात, [QE][QS]तुम्ही आमचे देव आहात. ते मागे वळतील, ते पूर्णपणे लज्जित होतील. [QE]
18. {#1शिस्तीचे फायदे मिळवण्यास इस्राएल असमर्थ } [QS]तुम्ही बहिऱ्यांनो ऐका; आणि तुम्ही आंधळ्यांनो, तुम्हास दिसावे म्हणून तुम्ही पाहा. [QE]
19. [QS]माझ्या सेवकाशिवाय कोण आंधळा आहे? किंवा ज्याला मी पाठवले त्या माझ्या निरोप्यासारखा बहिरा कोण आहे? [QE][QS]माझ्या कराराच्या भागीदारासारखा किंवा परमेश्वराच्या सेवकासारखा आंधळा कोण आहे? [QE]
20. [QS]तुम्ही पुष्कळ गोष्टी पाहता, परंतु त्याचे आकलन होत नाही; त्याचे कान उघडे आहेत, परंतु कोणी एक ऐकत नाही. [QE]
21. [QS]परमेश्वर आपल्या न्यायीपणामुळे आणि नियमशास्त्र वैभवशाली केल्याने खूश झाला. [QE]
22. [QS]पण हे लोक लुटलेले आणि लुबाडलेले आहेत; [QE][QS]ते सर्व खड्ड्यामध्ये सापळ्यात पडलेले आहेत, तुरुंगात कैदी झाले आहेत; [QE][QS]ते सर्व लूट असे झाले आहेत त्यांना सोडवणारा कोणी नाही आणि त्यांना परत माघारी म्हणणारा कोणी नाही! [QE]
23. [QS]तुमच्यातील याकडे कोण कान देईल? भविष्यात कोण कान देऊन ऐकेल आणि श्रवण करील? [QE]
24. [QS]याकोबाला लुटीस व इस्राएलास लुटणाऱ्यांस कोणी दिले? [QE][QS]ज्या परमेश्वराविरूद्ध आम्ही पाप केले, [QE][QS]त्याच्या मार्गाने चालण्यास त्यांनी नकार दिला आणि त्याचे नियम पाळण्याचे त्यांनी नाकारले त्यानेच की नाही? [QE]
25. [QS]म्हणून त्याने आपला भडकलेला कोप त्यांच्याविरुद्ध नासधूसीच्या युद्धासह ओतला. [QE][QS]त्याने त्यांच्या सभोवती आग लावली तरी त्यांना कळले नाही; त्यास जाळले. पण तरी तो मनावर घेईना. [QE]