1. {#1देवाचे उत्कृष्ट नियमशास्त्र आलेफ } [QS]ज्यांचे मार्ग निर्दोष आहेत, जे परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात [QE][QS]ते आशीर्वादित आहेत. [QE]
2. [QS]जे त्याच्या आज्ञा प्रामाणिकपणे पाळतात, जे संपूर्ण मनाने त्याचा शोध घेतात [QE][QS]ते आशीर्वादित आहेत. [QE]
3. [QS]ते चुकीचे करीत नाहीत; [QE][QS]ते त्याच्या मार्गात चालतात. [QE]
4. [QS]तुझे विधी आम्ही काळजीपूर्वक पाळावे [QE][QS]म्हणून तू आम्हास आज्ञा दिल्या आहेत. [QE]
5. [QS]मी नेहमी तुझे नियम पाळण्यासाठी [QE][QS]माझी वागणूक व्यवस्थित असावी, हेच माझे मागणे आहे. [QE]
6. [QS]मी जेव्हा तुझ्या सर्व आज्ञांचा विचार करीन [QE][QS]तेव्हा मी कधीही लाजणार नाही. [QE]
7. [QS]मी जेव्हा तुझे न्याय्य निर्णय शिकेन, [QE][QS]तेव्हा मी मनःपूर्वक तुला धन्यवाद देईन. [QE]
8. [QS]मी तुझे नियम पाळीन; [QE][QS]मला एकट्याला सोडू नकोस. [QE]
9. {#1बेथ } [QS]तरुण मनुष्य आपला मार्ग कशाने शुध्द राखील? [QE][QS]तुझ्या वचनाचे पालन करण्याने. [QE]
10. [QS]मी आपल्या मनापासून तुझा शोध केला आहे; [QE][QS]तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नकोस. [QE]
11. [QS]मी तुझ्याविरुध्द पाप करू नये [QE][QS]म्हणून तुझे वचन आपल्या हृदयात साठवून ठेवले आहे. [QE]
12. [QS]हे परमेश्वरा, तू धन्य आहेस; [QE][QS]मला तुझे नियम शिकव. [QE]
13. [QS]मी आपल्या मुखाने तुझ्या तोंडचे [QE][QS]सर्व योग्य निर्णय जे तू प्रकट केले ते जाहीर करीन. [QE]
14. [QS]तुझ्या आज्ञेच्या कराराचा मार्ग हीच माझी सर्व धनसंपत्ती [QE][QS]असे मानून मी त्यामध्ये अत्यानंद करतो. [QE]
15. [QS]मी तुझ्या नियमांचे मनन करीन, [QE][QS]आणि तुझ्या मार्गाकडे लक्ष देईन. [QE]
16. [QS]मी तुझ्या नियमांनी आनंदित होईन; [QE][QS]मी तुझे वचन विसरणार नाही. [QE]
17. {#1गीमेल } [QS]आपल्या सेवकावर दया कर याकरिता की; मी जिवंत रहावे, [QE][QS]आणि तुझे वचन पाळावे. [QE]
18. [QS]माझे डोळे उघड म्हणजे [QE][QS]तुझ्या नियमशास्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. [QE]
19. [QS]मी या देशात परका आहे; [QE][QS]तुझ्या आज्ञा माझ्यापासून लपवू नकोस. [QE]
20. [QS]तुझ्या योग्य निर्णयांची सतत उत्कंठा धरल्यामुळे [QE][QS]माझा जीव चिरडून गेला आहे. [QE]
21. [QS]तू गर्विष्ठांना रागावतोस, [QE][QS]तुझ्या आज्ञापासून भरकटतात ते शापित आहेत. [QE]
22. [QS]माझ्यापासून लाज आणि मानहानी दूर कर, [QE][QS]कारण मी तुझ्या कराराची आज्ञा पाळली आहे. [QE]
23. [QS]अधिपतीही माझ्याविरूद्ध कट रचतात आणि निंदा करतात, [QE][QS]तुझा सेवक तुझ्या नियमांचे मनन करतो. [QE]
24. [QS]तुझ्या कराराची आज्ञा मला आनंददायी आहे, [QE][QS]आणि ते माझे सल्लागार आहेत. [QE]
25. {#1दालेथ } [QS]माझा जीव धुळीस चिकटून आहे; [QE][QS]आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. [QE]
26. [QS]मी तुला आपले मार्ग सांगितले आणि तू मला उत्तर दिलेस; [QE][QS]तू मला आपले नियम शिकव. [QE]
27. [QS]मला तुझ्या विधींचा मार्ग समजावून दे. [QE][QS]यासाठी की, मी तुझ्या आश्चर्यकारक शिक्षणाचे मनन करावे. [QE]
28. [QS]माझा जीव दुःखाने गळून जातो; [QE][QS]आपल्या वचनाने मला उचलून धर. [QE]
29. [QS]असत्याचा मार्ग माझ्यापासून दूर कर; [QE][QS]कृपाकरून तुझे नियमशास्त्र मला शिकीव. [QE]
30. [QS]मी विश्वासाचा मार्ग निवडला आहे; [QE][QS]मी तुझे योग्य निर्णय आपल्यासमोर ठेवले आहेत. [QE]
31. [QS]मी तुझ्या कराराच्या निर्बंधास चिकटून राहिलो आहे; [QE][QS]हे परमेश्वरा, मला लज्जित होऊ देऊ नकोस. [QE]
32. [QS]मी तुझ्या आज्ञांच्या मार्गात धावेन, [QE][QS]कारण तू ते करण्यास माझे हृदय विस्तारित करतोस. [QE]
33. {#1हे } [QS]हे परमेश्वरा, तू आपल्या नियमाचा मार्ग मला शिकव [QE][QS]म्हणजे मी तो शेवटपर्यंत धरून राहिन. [QE]
34. [QS]मला बुद्धी दे म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन; [QE][QS]मी आपल्या अगदी मनापासून ते पाळीन. [QE]
35. [QS]तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालीव, [QE][QS]कारण त्यामध्ये चालण्यास मला आनंद आहे. [QE]
36. [QS]माझे मन तुझ्या कराराच्या निर्बंधाकडे असू दे, [QE][QS]आणि अन्याय्य लाभापासून दूर कर. [QE]
37. [QS]निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझे डोळे वळीव. [QE][QS]मला तुझ्या मार्गात पुर्नजीवीत कर. [QE]
38. [QS]तुझा सन्मान करणाऱ्यांना दिलेले वचन, [QE][QS]आपल्या सेवकासंबंधाने खरे कर. [QE]
39. [QS]ज्या अपमानाची मला धास्ती वाटते ती दूर कर, [QE][QS]कारण तुझे निर्णय उत्तम आहेत. [QE]
40. [QS]पाहा, मला तुझ्या विधींची उत्कंठा लागली आहे. [QE][QS]तू मला आपल्या न्यायत्वाने मला नवजीवन दे. [QE]
41. {#1वाव } [QS]हे परमेश्वरा, मला तुझे अचल प्रेम दे. [QE][QS]तुझ्या वचनाप्रमाणे मला तुझे तारण प्राप्त होवो. [QE]
42. [QS]जो माझी थट्टा करतो त्यास मला उत्तर देता येईल, [QE][QS]कारण मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवला आहे. [QE]
43. [QS]तू माझ्या मुखातून सत्य वचन काढून घेऊ नको, [QE][QS]कारण मी तुझ्या योग्य निर्णयाची प्रतिक्षा करतो. [QE]
44. [QS]मी सदैव तुझे नियमशास्त्र, [QE][QS]सदासर्वकाळ आणि कायम पाळीन. [QE]
45. [QS]मी सुरक्षितपणे चालेन, [QE][QS]कारण मी तुझे निर्बंध शोधले आहेत. [QE]
46. [QS]मी तुझ्या विधीवत आज्ञेबद्दल राजांसमोर बोलेन, [QE][QS]आणि मी लज्जित होणार नाही. [QE]
47. [QS]मी तुझ्या आज्ञेत आनंद करीन, [QE][QS]ज्या मला अतिशय प्रिय आहेत. [QE]
48. [QS]ज्या तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत, त्याकडे मी आपले हात उंचावीन; [QE][QS]मी तुझ्या नियमांचे मनन करीन. [QE]
49. {#1जायिन } [QS]तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनाची आठवण ठेव. [QE][QS]कारण तू मला आशा दिली आहेस. [QE]
50. [QS]माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की, [QE][QS]तुझे वचन मला नवजीवन देते; [QE]
51. [QS]गर्विष्ठांनी माझी टवाळी केली आहे, [QE][QS]तरी मी तुझ्या नियमशास्रापासून भरकटलो नाही. [QE]
52. [QS]हे परमेश्वरा, प्राचीन काळच्या तुझ्या निर्णयाविषयी मी विचार करतो, [QE][QS]आणि मी आपले समाधान करतो. [QE]
53. [QS]दुष्ट तुझे नियमशास्त्र नाकारतात, [QE][QS]म्हणून संताप माझा ताबा घेतो. [QE]
54. [QS]ज्या घरात मी तात्पुरता राहतो; [QE][QS]तुझे नियम मला माझे गीत झाले आहेत. [QE]
55. [QS]हे परमेश्वरा, रात्रीत मी तुझ्या नावाची आठवण करतो, [QE][QS]आणि मी तुझे नियमशास्त्र पाळतो. [QE]
56. [QS]हे मी आचरिले आहे, [QE][QS]कारण मी तुझे विधी पाळले आहेत. [QE]
57. {#1खेथ } [QS]परमेश्वर माझा वाटा आहे; [QE][QS]तुझे वचन पाळण्याचा मी निश्चय केला आहे. [QE]
58. [QS]मी आपल्या संपूर्ण हृदयाने तुझ्या अनुग्रहासाठी कळकळीची विनंती करतो; [QE][QS]तुझ्या वचनाप्रमाणे माझ्यावर कृपा कर; [QE]
59. [QS]मी आपल्या मार्गाचे परीक्षण केले, [QE][QS]आणि तुझ्या कराराकडे आपले पावली वळवीली. [QE]
60. [QS]मी तुझ्या आज्ञा पाळण्याची घाई केली, [QE][QS]आणि मी उशीर केला नाही. [QE]
61. [QS]दुष्टाच्या दोऱ्यांनी मला जाळ्यात पकडले आहे; [QE][QS]तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. [QE]
62. [QS]मी मध्यरात्री तुझ्या न्याय्य निर्णयांबद्दल [QE][QS]तुला धन्यवाद देण्यासाठी उठतो. [QE]
63. [QS]तुझे भय धरणाऱ्या सर्वांचा, [QE][QS]तुझे विधी पाळणाऱ्यांचा, मी साथीदार आहे. [QE]
64. [QS]हे परमेश्वरा, तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने सर्व पृथ्वी भरली आहे. [QE][QS]तू आपले नियम मला शिकव. [QE]
65. {#1ठेथ } [QS]हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे, [QE][QS]आपल्या सेवकाचे चांगले केले आहेस. [QE]
66. [QS]योग्य निर्णय घेण्याविषयीचे ज्ञान आणि बुद्धी तू मला दे, [QE][QS]कारण तुझ्या आज्ञांवर माझा विश्वास आहे. [QE]
67. [QS]पीडित होण्यापूर्वी मी बहकलो होतो, [QE][QS]परंतु आता मी तुझे वचन पाळीत आहे. [QE]
68. [QS]तू चांगला आहेस आणि तू चांगले करतोस. [QE][QS]मला तुझे नियम शिकव. [QE]
69. [QS]गर्विष्ठांनी माझ्यावर लबाडीने चिखलफेक केली आहे, [QE][QS]पण मी तुझे विधी अगदी मनापासून पाळीन. [QE]
70. [QS]त्यांचे हृदय कठीण झाले आहे, [QE][QS]पण मला तुझ्या नियमशास्त्रात आनंद आहे. [QE]
71. [QS]मी पीडित झाल्यामुळे माझे चांगले झाले; [QE][QS]त्यामुळे, मी तुझे नियमशास्त्र शिकलो. [QE]
72. [QS]सोने आणि रुपे ह्यांच्या हजारो तुकड्यापेक्षा, [QE][QS]मला तुझ्या तोंडचे नियमशास्त्र अधिक मोलवान आहेत. [QE]
73. {#1योद } [QS]तुझ्या हातांनी मला निर्माण केले आणि आकार दिला; [QE][QS]मला बुद्धी दे म्हणजे मी तुझ्या आज्ञा शिकेन. [QE]
74. [QS]तुझा सन्मान करणारे मला पाहून हर्ष करतील, [QE][QS]कारण मला तुझ्या वचनात आशा सापडली आहे. [QE]
75. [QS]हे परमेश्वरा, तुझे निर्णय न्यायानुसार आहेत हे मला माहित आहेत, [QE][QS]आणि तुझ्या सत्यतेने मला पीडिले आहे. [QE]
76. [QS]तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनानुसार, [QE][QS]आपल्या कराराच्या विश्वसनीयतेने सांत्वन कर. [QE]
77. [QS]मला कळवळा दाखव यासाठी की, मी जिवंत राहीन, [QE][QS]कारण तुझे नियमशास्त्र माझा आनंद आहे. [QE]
78. [QS]गर्विष्ठ लज्जित होवोत, [QE][QS]कारण त्यांनी माझी निंदानालस्ती केली आहे; [QE][QS]पण मी तुझ्या विधींचे मनन करीन; [QE]
79. [QS]तुझा सन्मान करणारे माझ्याकडे वळोत, [QE][QS]म्हणजे त्यांना तुझे निर्बंध कळतील. [QE]
80. [QS]मी लज्जित होऊ नये याकरिता माझे हृदय आदराने, [QE][QS]तुझ्या निर्दोष नियमाकडे लागू दे. [QE]
81. {#1काफ } [QS]मी तुझ्या विजयासाठी उत्कंठा धरतो; [QE][QS]मी तुझ्या वचनावर आशा ठेवली आहे. [QE]
82. [QS]माझे डोळे तुझे वचन पाहण्यास आसुसले आहेत; [QE][QS]तू माझे सांत्वन कधी करशील? [QE]
83. [QS]कारण मी धुरात ठेविलेल्या बुधलीसारखा झालो आहे; [QE][QS]तरी मी तुझे नियम विसरलो नाही. [QE]
84. [QS]तुझ्या सेवकाचे किती वेळ वाट पाहावी लागणार आहे? [QE][QS]जे माझा छळ करतात. त्यांचा न्याय तू कधी करशील? [QE]
85. [QS]गार्विष्ठांनी माझ्यासाठी खाचा खणून ठेविल्या आहेत, [QE][QS]तुझे नियमशास्त्र झुगारले आहे. [QE]
86. [QS]तुझ्या सर्व आज्ञा विश्वसनीय आहेत; [QE][QS]ते लोक माझा छळ अनुचितपणे करत आहेत; मला मदत कर. [QE]
87. [QS]त्यांनी पृथ्वीवरून माझा जवळजवळ सर्वनाश केला; [QE][QS]पण मी तुझे विधी नाकारले नाहीत. [QE]
88. [QS]तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने वचन दिल्याप्रमाणे मला नवजीवन दे, [QE][QS]याकरिता की, मी तुझ्या तोंडचे निर्बंध पाळीन. [QE]
89. {#1लामेद } [QS]हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्वकाळ स्थिर आहे; [QE][QS]तुझे वचन स्वर्गात ठामपणे प्रस्थापित आहे. [QE]
90. [QS]तुझी सत्यता सदासर्वदा सर्व पिढ्यानपिढ्यासाठी आहे; [QE][QS]तू पृथ्वीची स्थापना केलीस आणि म्हणून ती टिकून राहते. [QE]
91. [QS]त्या सर्व गोष्टी आजपर्यंत, तुझ्या निर्णयात म्हटल्याप्रमाणे राहिली आहेत, [QE][QS]कारण सर्व गोष्टी तुझी सेवा करतात. [QE]
92. [QS]जर तुझे नियमशास्त्र माझा आनंद नसता, [QE][QS]तर माझ्या दुःखात माझा नाश झाला असता. [QE]
93. [QS]मी तुझे निर्बंध कधीच विसरणार नाही, [QE][QS]कारण त्याद्वारे तू मला सजीव ठेवले आहे. [QE]
94. [QS]मी तुझाच आहे; माझा उध्दार कर. [QE][QS]कारण मी तुझे निर्बंध शोधले आहेत. [QE]
95. [QS]दुष्टांनी माझा नाश करायची तयारी केली आहे, [QE][QS]पण मी तुझ्या कराराच्या निर्बंधाचा शोध घेईन. [QE]
96. [QS]प्रत्येकगोष्टीला त्याची मर्यादा असते हे मी पाहिले आहे, [QE][QS]पण तुझ्या आज्ञा व्यापक, मर्यादे पलीकडे आहेत. [QE]
97. {#1मेम } [QS]अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहेत! [QE][QS]दिवसभर मी त्याच्यावर मनन करतो. [QE]
98. [QS]तुझ्या आज्ञा मला माझ्या शत्रूंपेक्षा ज्ञानी करतात, [QE][QS]कारण तुझे नियम नेहमी माझ्याजवळ आहेत. [QE]
99. [QS]माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मला अधिक बुद्धी आहे. [QE][QS]कारण मी तुझ्या कराराच्या निर्बंधाचे मनन करतो. [QE]
100. [QS]वयोवृध्दापेक्षा मला अधिक कळते; [QE][QS]कारण मी तुझे विधी पाळतो. [QE]
101. [QS]तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून दूर ठेवतो. [QE][QS]या करता, मी तुझे वचन पाळावे. [QE]
102. [QS]मी तुझ्या निर्णयापासून दुसऱ्याबाजूला वळलो नाही, [QE][QS]कारण तू मला शिकविले आहे. [QE]
103. [QS]तुझे वचन माझ्या चवीला कितीतरी गोड आहेत, [QE][QS]होय माझ्या मुखाला मधापेक्षा गोड आहेत. [QE]
104. [QS]तुझ्या विधींच्याद्वारे मला बुद्धी प्राप्त होते; [QE][QS]यास्तव मी प्रत्येक खोट्या मार्गाचा द्वेष करतो. [QE]
105. {#1नून } [QS]तुझे वचन माझ्या पावलाकरता दिवा आहे, [QE][QS]आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे. [QE]
106. [QS]तुझे निर्णय पाळण्याची मी शपथ वाहिली आहे, [QE][QS]व ती पक्की केली आहे. [QE]
107. [QS]मी फार पीडित आहे; [QE][QS]हे परमेश्वरा तुझ्या वचनात वचन दिल्याप्रमाणे मला जिवीत ठेव. [QE]
108. [QS]हे परमेश्वरा, माझ्या मुखातील वचने ही स्वसंतोषाची अर्पणे समजून स्वीकार कर, [QE][QS]आणि मला तुझे निर्णय शिकव. [QE]
109. [QS]माझे जीवन नेहमीच धोक्यात असते, [QE][QS]तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. [QE]
110. [QS]दुष्टांनी माझ्यासाठी पाश रचला आहे, [QE][QS]पण मी तुझ्या विधीपासून भरकटलो नाही. [QE]
111. [QS]तुझे निर्बंध माझे सर्वकाळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहे, [QE][QS]कारण त्याच्या योगे माझ्या मनाला आनंद होतो. [QE]
112. [QS]तुझे नियम सर्वकाळ शेवटपर्यंत पाळण्याकडे [QE][QS]मी आपले मन लाविले आहे. [QE]
113. {#1सामेख } [QS]परमेश्वरा, जे लोक तुझ्याशी पूर्णपणे प्रामाणिक नाहीत त्या लोकांचा मी तिरस्कार करतो, पण मला तुझी शिकवण आवडते. [QE]
114. [QS]मला लपव आणि माझे रक्षण कर. परमेश्वरा, तू जे काही सांगतोस त्यावर माझा विश्वास आहे. [QE]
115. [QS]वाईट करणाऱ्यांनो माझ्यापासून दूर जा, [QE][QS]यासाठी की, मी आपल्या देवाच्या आज्ञा पाळीन. [QE]
116. [QS]तू आपल्या वचनानुसार मला आधार दे म्हणजे मी जगेन, [QE][QS]आणि माझ्या आशा लज्जित होऊ देऊ नकोस. [QE]
117. [QS]मला आधार दे म्हणजे मी सुरक्षित राहीन; [QE][QS]मी नेहमीच तुझ्या नियमांवर मनन करीन. [QE]
118. [QS]तुझ्या नियमापासून बहकले आहेत त्यांना तू नाकारतोस, [QE][QS]कारण हे लोक फसवणारे आणि अविश्वसनीय आहेत. [QE]
119. [QS]पृथ्वीवरील सर्व दुष्टांना तू गाळाप्रमाणे दूर करतो; [QE][QS]म्हणून मी तुझ्या विधीवत करारावर प्रेम करतो. [QE]
120. [QS]तुझ्या भितीने माझे शरीर थरथरते, [QE][QS]आणि तुझ्या न्याय्य निर्णयाची भिती वाटते. [QE]
121. {#1ऐन } [QS]मी जे योग्य आहे आणि चांगले आहे तेच करतो; [QE][QS]माझा छळ करणाऱ्याकडे मला सोडून देऊ नको. [QE]
122. [QS]तू आपल्या सेवकाच्या कल्याणार्थ जामीन हो. [QE][QS]गर्विष्ठांना मला जाचू देऊ नकोस. [QE]
123. [QS]तू सिद्ध केलेल्या तारणाची [QE][QS]व तुझ्या न्याय्य वचनाची प्रतिक्षा करून माझे डोळे थकले आहेत. [QE]
124. [QS]तुझ्या सेवकाला कराराची विश्वसनियता दाखव [QE][QS]आणि मला तुझे नियम शिकव. [QE]
125. [QS]मी तुझा सेवक आहे, [QE][QS]मला तुझ्या कराराच्या निर्बंधाचे ज्ञान व्हावे म्हणून मला बुद्धी दे. [QE]
126. [QS]ही वेळ परमेश्वराच्या कार्याची आहे, [QE][QS]कारण लोकांनी तुझे नियमशास्त्र मोडले आहे. [QE]
127. [QS]खरोखर मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा, [QE][QS]बावनकशी सोन्यापेक्षा प्रिय मानतो. [QE]
128. [QS]यास्तव मी काळजी पूर्वक तुझे सर्व विधी पाळतो, [QE][QS]आणि प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करतो. [QE]
129. {#1पे } [QS]तुझे कराराचे निर्बंध आश्चर्यकारक आहेत; [QE][QS]म्हणूनच मी ते पाळतो. [QE]
130. [QS]तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो; [QE][QS]त्याने अशिक्षितास ज्ञान प्राप्त होते. [QE]
131. [QS]मी आपले तोंड उघडले आणि धापा टाकल्या, [QE][QS]कारण मी तुझ्या आज्ञेची उत्कंठा धरली. [QE]
132. [QS]तू माझ्याकडे वळ आणि माझ्यावर दया कर, [QE][QS]जशी तुझ्या नावावर प्रीती करणाऱ्यावर तू दया करतोस. [QE]
133. [QS]तुझ्या वचनाप्रमाणे मला मार्गदर्शन कर; [QE][QS]माझ्यावर कोणत्याही पापाची सत्ता चालू देऊ नको. [QE]
134. [QS]मनुष्याच्या जाचजुलमापासून मला मुक्त कर [QE][QS]याकरिता की, मी तुझे विधी पाळीन. [QE]
135. [QS]तू आपला मुखप्रकाश आपल्या सेवकावर पाड, [QE][QS]आणि तुझे नियम मला शिकव. [QE]
136. {#1त्सादे } [QS]माझ्या डोळ्यातून अश्रूंचे प्रवाह खाली वाहतात; [QE][QS]कारण लोक तुझे नियमशास्त्र पाळत नाहीत. [QE]
137. [QS]हे परमेश्वरा, तू न्यायी आहेस, [QE][QS]आणि तुझे निर्णय योग्य आहेत. [QE]
138. [QS]तू आपले निर्बंध न्याय्य व पूर्ण विश्वसनीय [QE][QS]असे लावून दिले आहेत. [QE]
139. [QS]रागाने माझा नाश केला आहे, [QE][QS]कारण माझे शत्रू तुझे वचन विसरले आहेत. [QE]
140. [QS]तुझ्या वचनाची खूपच पारख झाली आहे, [QE][QS]आणि ते तुझ्या सेवकाला प्रिय आहे. [QE]
141. [QS]मी उपेक्षणीय आणि तुच्छ मानलेला आहे, [QE][QS]तरी मी तुझे विधी विसरत नाही. [QE]
142. [QS]तुझे न्याय्यत्व हे सर्वकाळ योग्य आहे, [QE][QS]आणि नियमशास्त्र सत्य आहे. [QE]
143. [QS]मला खूप संकट आणि क्लेशांनी घेरिले आहे, तरी तुझ्या आज्ञांत मला आनंद आहे. [QE]
144. [QS]तुझ्या कराराचे निर्बंध सर्वकाळ न्याय्य आहेत; [QE][QS]मला बुद्धी दे म्हणजे मी जगेन. [QE]
145. {#1कोफ } [QS]मी संपूर्ण मनापासून तुला हाक मारतो, हे परमेश्वरा, मला उत्तर दे, [QE][QS]मी तुझे नियम पाळीन. [QE]
146. [QS]मी तुला हाक मारतो; तू मला तार [QE][QS]आणि मी तुझे कराराचे नियम पाळीन. [QE]
147. [QS]मी उजडण्यापूर्वी पहाटेस उठतो आणि मदतीसाठी आरोळी मारतो. [QE][QS]तुझ्या वचनात माझी आशा आहे. [QE]
148. [QS]तुझ्या वचनावर चिंतन करण्यासाठी [QE][QS]रात्रीच्या प्रत्येक प्रहरापूर्वी माझे डोळे उघडे असतात. [QE]
149. [QS]तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने माझी वाणी ऐक; [QE][QS]हे परमेश्वरा, तू आपल्या निर्णयानुसार मला जिवंत ठेव. [QE]
150. [QS]जे माझा छळ करतात ते माझ्याजवळ येत आहेत, [QE][QS]पण ते तुझ्या नियमशास्रापासून फार दूर आहेत. [QE]
151. [QS]हे परमेश्वरा, तू जवळ आहेस [QE][QS]आणि तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत. [QE]
152. [QS]तुझ्या कराराच्या निर्बंधावरून मला पूर्वीपासून माहित आहे की, [QE][QS]ते तू सर्वकाळासाठी स्थापिले आहेत. [QE]
153. {#1रेश } [QS]माझे दु:ख पाहा आणि मला मदत कर, [QE][QS]कारण मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. [QE]
154. [QS]तू माझा वाद चालव आणि माझा उद्धार कर. [QE][QS]तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. [QE]
155. [QS]दुष्टपासून तारण फार दूर आहे, [QE][QS]कारण त्यांना तुझे नियम प्रिय नाहीत. [QE]
156. [QS]हे परमेश्वरा, तुझी करुणा थोर आहे, [QE][QS]तू आपल्या निर्णयास अनुसरुन मला नवजीवन दे. [QE]
157. [QS]मला छळणारे माझे शत्रू पुष्कळ आहेत, [QE][QS]तरी मी तुझ्या कराराच्या निर्बंधापासून मागे वळलो नाही. [QE]
158. [QS]विश्वासघातक्यांना पाहून मला वीट आला आहे. [QE][QS]कारण ते तुझे वचन पाळीत नाहीत. [QE]
159. [QS]तुझ्या विधींना मी किती प्रिय मानितो ते पाहा; हे परमेश्वरा, [QE][QS]तुझ्या वचनाप्रमाणे कराराच्या विश्वसनीयतेने मला जिवंत ठेव. [QE]
160. [QS]तुझ्या वचनाचे मर्म सत्य आहे; [QE][QS]तुझ्या न्यायीपणाचा प्रत्येक निर्णय सर्वकाळ आहे. [QE]
161. {#1शीन } [QS]अधिपती विनाकारण माझ्या पाठीस लागले आहेत; [QE][QS]तुझे वचन न पाळल्यामुळे माझे हृदय भितीने कापते. [QE]
162. [QS]ज्याला मोठी लूट सापडली त्याच्यासारखा [QE][QS]मला तुझ्या वचनाविषयी आनंद होतो. [QE]
163. [QS]मी असत्याचा द्वेष आणि तिरस्कार करतो, [QE][QS]पण मला तुझे नियमशास्त्र प्रिय आहे. [QE]
164. [QS]मी दिवसातून सात वेळा तुझ्या न्याय्य, [QE][QS]निर्णयांसाठी तुझी स्तुती करतो. [QE]
165. [QS]तुझ्या नियमशास्त्रावर प्रेम करणाऱ्यास मोठी शांती असते, [QE][QS]त्यास कसलेच अडखळण नसते. [QE]
166. [QS]हे परमेश्वरा, मी तुझ्या उध्दाराची वाट पाहत आहे [QE][QS]आणि तुझ्या आज्ञा मी पाळल्या आहेत. [QE]
167. [QS]मी तुझ्या विधीवत आज्ञांप्रमाणे वागलो, [QE][QS]आणि मला ते अत्यंत प्रिय आहेत. [QE]
168. [QS]मी तुझे निर्बंध आणि तुझे विधीवत आज्ञा पाळल्या आहेत, [QE][QS]कारण मी जी प्रत्येकगोष्ट केली ते सर्व तुला माहित आहे. [QE]
169. {#1ताव } [QS]हे परमेश्वरा, माझी मदतीसाठीची आरोळी ऐक. [QE][QS]तू आपल्या वचनाप्रमाणे मला बुद्धी दे. [QE]
170. [QS]माझी विनंती तुझ्यासमोर येवो; [QE][QS]तू वचन दिल्याप्रमाणे मला मदत कर. [QE]
171. [QS]तू मला आपले नियम शिकवितोस [QE][QS]म्हणून माझ्या मुखातून स्तुती बाहेर पडो. [QE]
172. [QS]माझी जीभ तुझ्या वचनाची स्तुती गावो; [QE][QS]कारण तुझ्या सर्व आज्ञा न्याय्य आहेत. [QE]
173. [QS]तुझा हात माझे साहाय्य करण्यास सिद्ध असो, [QE][QS]कारण तुझे निर्बंध मी निवडले आहेत. [QE]
174. [QS]हे परमेश्वरा, मी तुझ्या तारणाची उत्कंठा धरली आहे [QE][QS]आणि तुझ्या नियमशास्त्रत मला आनंद आहे. [QE]
175. [QS]माझा जीव वाचो म्हणजे तो तुझी स्तुती करील; [QE][QS]तुझे निर्णय मला मदत करो. [QE]
176. [QS]मी हरवलेल्या मेंढराप्रमाणे भरकटलो आहे; [QE][QS]तू आपल्या सेवकाचा शोध कर, [QE][QS]कारण मी तुझ्या आज्ञा विसरलो नाही. [QE]