मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता 44:1

Notes

No Verse Added

स्तोत्रसंहिता 44:1

1
देवा, आम्ही तुझ्याबद्दल ऐकले आहे. आमच्या वडिलांनी तू त्यांच्या आयुष्यात काय केलेस ते सांगितले, खूप पूर्वी तू काय केलेस तेही त्यांनी सांगितले.
2
देवा, तू तुझ्या सर्व शक्तीने हा देश इतर लोकांपासून घेतलास आणि तो आम्हाला दिलास तू त्या परदेशी माणसांना चिरडलेस तू त्यांना हा देश सोडायला भाग पाडलेस.
3
हा देश आमच्या वडिलांच्या तलवारीने मिळवलेला नाही. त्यांच्या कणखर बाहूंनी त्यांना विजयी केले नाही. हे घडले कारण तू त्यांच्या बरोबर होतास. देवा तुझ्या पराक्रमी शक्तीमुळे आमचे वाडवडील वाचले का? कारण तू त्यांच्यावर प्रेम केलेस.
4
देवा, तू माझा राजा आहेस आज्ञा आणि याकोबाच्या माणसांना विजयाप्रत ने.
5
देवा, तुझ्या मदतीने आम्ही शत्रूला मागे रेटू. तुझ्या नावाने आम्ही आमच्या शत्रूवर चालून जाऊ.
6
माझ्या धनुष्यबाणांवर माझा विश्वास नाही. माझी तलवार मला वाचवू शकणार नाही.
7
देवा, तू आम्हाला मिसर पासून वाचवलेस. तू आमच्या शत्रूंना लाजवले आहेस.
8
आम्ही रोज देवाची स्तुती करु आम्ही तुझ्या नावाची सदैव स्तुती करत राहू.
9
परंतु देवा, तू आम्हाला सोडून गेलास. तू आम्हाला अडचणीत टाकलेस तू आमच्याबरोबर लढाईत आला नाहीस.
10
तू आमच्या शत्रूंना आम्हाला मागे रेटू दिलेस. शत्रूंनी आमची संपत्ती घेतली.
11
तू आम्हाला मेंढ्यासारखे खायचे अन्न म्हणून देऊन टाकले. तू आम्हाला राष्ट्रांमध्ये इतस्तता विखरुन टाकले.
12
देवा, तू आम्हाला कवडीमोलाने विकलेस. तू किंमतीसाठी घासाघीस देखील केली नाहीस.
13
तू शेजाऱ्यांमध्ये आमचे हसे केलेस. आमचे शेजारी आम्हाला हसतात. ते आमची मस्करी करतात.
14
आम्ही म्हणजे लोकांनी सांगितलेली हसवणूक आहोत, ज्यांना स्वत चा देश नाही असे लोकही आम्हाला हसतात आणि मान हलवतात.
15
मी लाजेने वेढला गेलो आहे. दिवसभर मला माझी लाज दिसते.
16
माझ्या शत्रूंनी मला अडचणीत आणले माझे शत्रू माझी चेष्टा करुन जशास तसे वागायचा प्रयत्न करतात.
17
देवा, आम्ही तुला विसरलो नाही तरीही तू आम्हाला या सगळ्या गोष्टी करतोस आम्ही तुझ्याबरोबर केलेल्या करारनाम्यावर सही केली तेव्हा खोटे बोललो नाही.
18
देवा, आम्ही तुझ्यापासून दूर गेलो नाही. आम्ही तुझा मार्ग चोखाळणे बंद केले नाही.
19
परंतु देवा, तू आम्हाला कोल्हे राहातात त्या जागेत चिरडलेस, मृत्यूसारख्या अंधाऱ्याजागेत तू आम्हाला झाकलेस.
20
आम्ही आमच्या देवाचे नाव विसरलो का? आम्ही परक्या देवाची प्रार्थना केली का? नाही.
21
देवाला खरोखरच या गोष्टी माहीत असतात. त्याला आपल्या ह्दयातल्या अगदी आतल्या गुप्त गोष्टीही माहीत असतात.
22
देवा आम्ही रोज तुझ्यासाठी मारले जात आहोत. मारण्यासाठी नेल्या जाणाऱ्या मेंढ्यांप्रमाणे आम्ही आहोत.
23
प्रभु, ऊठ तू का झोपला आहेस? ऊठ आम्हाला कायमचा सोडून जाऊ नकोस.
24
देवा, तू आमच्यापासून लपून का राहात आहेस? तू आमची दु:ख आणि संकट विसरलास का?
25
तू आम्हाला घाणीत ढकलून दिले आहेस आम्ही धुळीतपोटावर पडलो आहोत.
26
देवा, ऊठ! आम्हाला मदत कर. मेहेरबानी करुन आम्हाला वाचव.
×

Alert

×

marathi Letters Keypad References