मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
ईयोब 10:1

Notes

No Verse Added

ईयोब 10:1

1
मी माझ्या स्वत:च्या आयुष्याचा तिरस्कार करतो म्हणून मी मुक्तपणे तक्रार करीन. माझा आत्मा कडू जहर झालेला आहे म्हणून मी आता बोलेन.
2
मी देवाला म्हणेन, ‘मला दोष देऊ नकोस. मी काय चूक केली आहे ते मला सांग. माझ्याविरुध्द तुझ्या मनात काय आहे?
3
देवा, मला कष्ट देण्यात मुला सुख वाटते का? तुझ्या निर्मिती विषयी तुलाच आस्था नसावी असे वाटते, की वाईट लोकांनी ज्या मसलती केल्या त्या बाबतीत तू समाधानी आहेस?
4
देवा, तुला मानवी डोळे आहेत का? लोकांना दिसते ते तुला दिसते का?
5
तुझे आयुष्य आमच्या आयुष्याइतकेच लहान आहे का? ते माणसाच्या आयुष्याइतकेच थोडे आहे का? नाही तर मग त्या विषयी तू कसे जाणून घेतोस?
6
तू माझ्या चुका शोधत असतोस, माझी पापं धुंडाळीत असतोस.
7
मी निष्पाप आहे हे तुला माहित आहे. परंतु तुझ्या हातातून मला कुणीही वाचवू शकणार नाही.
8
देवा, तुझ्या हातांनी माझी निर्मिती केली, माझ्या शरीराला आकार दिला. परंतु आता तेच हात माझ्याभोवती आवळले जात आहेत आणि माझा नाश करीत आहेत.
9
देवा, जरा आठव तू मला मातीसारखे बनवलेस. आता तूच परत माझी माती करणार आहेस का?
10
तू मला दुधासारखे ओतलेस आता दही घुसळणाऱ्याप्रमाणे तू मला घुसळून बदलणार आहेस का?
11
हाडे आणि स्नायू यांनी तू मला एकत्र बांधलेस. नंतर तू मला कातडीचे आणि मांसाचे कपडे चढविलेस.
12
तू माझ्यात प्राण ओतलेस आणि माझ्याशी अंत्यत दयाळू राहिलास. तू माझी काळजी वाहिलीस आणि माझ्या जीवाचे रक्षण केलेस.
13
परंतु तू हे तुझ्या हृदयात लपवून ठेवलेस तू तुझ्या हृदयात याची गुप्तपणे आखणी केलीस हे मला माहित आहे. तुझ्या मनात हेच होते याची जाणीव मला आहे.
14
मी पाप करतो तेव्हा तू माझ्यावर नजर ठेवतोस कारण त्यामुळेच माझ्या पापाबद्दल तू मला शिक्षा करशील
15
पाप केल्यावर मी अपराधी असेन आणि माझ्या दृष्टीने ते फारच वाईट असेल. परंतु मी निष्पाप असूनही माथा उंच करु शकत नाही. मला खूप लाज वाटते आणि मी गोंधळून जातो.
16
मी जेव्हा यशस्वी होतो आणि मला गर्व चढू लागतो तेव्हा शिकाऱ्याने सिंहाची शिकार करावी तशी तू माझी शिकार करतोस. तू तुझे सामर्थ्य पुन्हा माझ्याविरुध्द दाखवितोस.
17
माझी चूक सिध्द करण्यासाठी तुझ्याकडे नेहमीच कुणीतरी असते. माझ्यावराचा तुझा राग अधिकच भडकेल. तू माझ्याविरुध्द सैन्याची आणखी कुमक पुन: पुन्हा आणशील.
18
म्हणून देवा, तू मला जन्माला तरी का घातलेस? मी कुणाच्या दृष्टीस पडण्याआधीच मेलो असतो तर बरे झाले असते.
19
मी जगलोच नसतो तर बरे झाले असते. माझ्या मातेच्या उदरातून मला सरळ थडग्यातच नेले असते तर किती चांगले झाले असते.
20
माझे आयुष्य जवळ जवळ संपले आहे, म्हणून तू मला एकटे सोड. जिथून कुणीही परत येत नाही तिथे म्हणजे अंधार आणि मृत्यूच्या जागी जाण्यापूर्वी जो काही थोडा वेळ माझ्यासाठी उरला आहे त्याचा मला उपभोग घेऊ दे.
22
काळोखाच्या गर्भात, मृत्यूलोकात जाण्यासाठी जो थोडा वेळ अजून आहे तो मला सुखाने घालवू दे, जिथून कुणीही परत येत नाही अशा काळोखाने दाट छायेने आणि गोंधळाने भरलेल्या, ज्या जागी प्रकाशसुध्दा अंधकारमय आहे अशा जागी जाण्यापूर्वी मला सुखाने जगू दे.”‘
×

Alert

×

marathi Letters Keypad References